श्री सद्गुरू समर्थ दत्तात्रय गुरु ज्ञान मंदिर गोराई
English

गुरुमाऊली



भक्तवत्सल सद्गुरू । दुभती घेनू अभेद पाझरु ।।
सत्शिष्य केवळ वासरु । प्राणप्रिय तिचे ।।


श्री गुरुस्वरुप झालेल्या गुरुमाऊलीचा परिचय शब्दांनी करुन देणे अवघडच आहे. सर्वांना समावून घेत गुरुमाऊली आपले गुरु स्वरुप दाखवून शिष्याला तेचरुप करुन आपल्यातसामावून घेणारी गुरुमाऊली.

१. पुर्वायुष्य
२. साधकस्थिती
३. सद्गुरू

१.  पुर्वायुष्य


श्री. स.स माधुरीनाथ उर्फ सौ. माधुरी दि बल्लाळ यांचा जन्म अलिबाग येथे २८ जुलै १९५८ रोजी अधिक श्रावण शुध्द त्रयोदशीपरम चतुर्दशी या संधीत झाला. त्यांच्या आई श्रीमती शकुंतला पंडित व वडिल श्री. शंकर निळकंठ पंडित. यांचे मूळ नांव मिराशी व पुढे पंडित हा किताब मिळाल्यावर पंडित हेच नाव रूढ राहिले. लहानपणी आजी श्रीमती इंदिराबाई पंडित.पुराणातील पंचतंत्रातील इसापनीतीतील गोष्टी सांगत असे. अजूनही या गोष्टी गुरुमाऊलीकडून ऐकायला मिळतात.

पुढे वडिलांच्या फिरतीच्या नोकरीमुळे जालना, खालापूर वगैरे गावीवास्तव्य घडले व पुन्हा एकदा अलिबागेत स्थैर्य मिळाले. त्यांचे कॉलेजमधील शिक्षण अलिबागलाझाले. पुढे एम.एस.सी (रिअल मॅथ्स) केल्यावर देवरुख येथील कॉलेजमध्ये लेक्चरशिप स्विकारली. यानंतर मुंबईच्या SIWS कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून रुजू झाल्या. शिकवत असतांना एम.एस.सी (applied maths) पूर्ण केले. याच दरम्यान; mechanics, mathematical logic या विषयांमध्येविशेषप्राविण्य मिळवले.असे ज्ञानार्जन व ज्ञानदान हे दोन्हीही एकाच वेळेस सुरु होते. कॉलेजशी संबधित सामाजिक चळवळीमधून भाग घेत क्रिडाक्षेत्रातही जिमखान्याचे स्त्री प्रमुख पद भूषविले.

१५ मे १९८३ रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘श्री. दिपक केशव बल्लाळ’ यांच्याशीविवाहबध्द झाल्या. श्री दिपकरावांचे घराणे, शिवाजी महाराजांच्याअष्टप्रधान मंडळातील श्री. खंडेा बल्लाळांचे घराणे.

पुढे चि. तुषार व चि. मंदार यांच्या जन्मानंतर घरगुती कारणामुळे व मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी गुरुमाऊलीने नोकरीचा राजीनामा दिला. पण तरीही मसाले, पापड, लोणची तयार करण्याचा उद्योग घरबसल्या करुन आपल्याबरोबर चार बायकांना रोजगार मिळवून दिला व आपल्या कार्यक्षमेतची खात्री पटवून दिली.

उद्यमशिलता, नवे करुन पाहण्याची साहसी वृत्ती, येणाऱ्या अडिअडचणींना तोंड देण्याचे धैर्य, त्यातून सन्मार्ग काढण्यासाठी कुशाग्र, बुद्धिमत्ता, नवे मार्ग चोखाळताना सर्व शक्तीने मुसंडी मारण्याची वृत्ती, या सहा गुणांचा पुतळा महणजे गुरुमाऊली।

२.  साधकस्थिती


स. स. दत्तमहाराज चोळकरयांचे आगमन गुरुमाऊलींच्या घरी डोंबिवली येथे झाले. सासूबाई श्रीमती प्रमिलाताई बल्लाळ व यजमान श्री. दिपक बल्लाळ दोघेही महाराजांचे शिष्य असल्यामुळे सहजच अतिथी स्वागताचा भाग गुरुमाऊलीकडे आला. तो गुरुमाऊलीने व्यवस्थितपणे पार पाडला.

बुध्दीवादी व करारी स्वभावाला बुवाबाजीचे स्तोमपसंत नव्हते. परंतु श्री. स.स.दत्तमहाराजांनी प्राध्यापकाच्या गणिती भाषेत आत्मज्ञानाची, ब्रह्मविद्येची बैठक पटविल्यावरच गुरुमाऊलीने २८ सप्टेंबर १९८८ रोजी अश्विन कृष्ण चतुर्थी या दिवशी बोध घेतला.

त्यानंतर जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा मुलांचा अभ्यास संभाळून गुरुमाऊली सासूबाईंबरोबर श्रवणाला जात राहिल्या. त्या दरम्यान महाराजांनी त्यांचा अभ्यास करवून घेतला आणि वर्षभरातच म्हणजे १४ नोव्हेंबर १९८९ पौष कृष्ण प्रतिपदेला श्री. स.स. दत्तमहाराजांनी देह ठेवला.

महिनाभर गुरुमाऊलीची दिङमुढअवस्था होती. पण गुरुमहाराजांची वचने चैतन्य जागृत करतात. आपण स्वतः आपले आत्मभोजन करावे. आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करताना आलेल्या, अतिथी अभ्यागतालाआत्मभोजनासाठी बरोबर घ्यावे व सर्वांनीच निरंकुष आत्मतृप्तीचा लाभ घ्यावा, या तत्वानुसार सुमारे पाच वर्षे गुरुमाऊली स्वतःचा अभ्यास दृढ करीत राहिली. सोबत आपले जेष्ठ गुरुबंधू, श्री भागिरथी आईचे शिष्य, श्री दत्तमहाराजांचे शिष्य या सर्वांना बरेाबर घेऊन उत्सव निमिताने कथा पोथी असा दिनक्रम सुरु होता. सर्वांशी मिसळून वागण्याचा स्वभाव व कोणतीही गोष्ट करुन शिकवण्याची हातवटी त्यामुळे त्या लवकरच लोकप्रिय झाल्या. त्यातून अनेक बध्द जीवांना मुमुक्षुदशा प्राप्त होऊन गुरुबोध घेण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. पण ज्यांना हवा त्यांनी प्रचलित गुरुगादी चालू असलेल्या इंदूर किंवा पुण्याला जाऊन जेष्ठ गुरुबंधूकडून बोध घ्यावा असे वेळोवेळी सांगितले.

डोंबिवलीला दिवसातून तीन वेळा सार्वजनिक पोथी आणि भजन (पहाटे, सकाळी दहा,दुपारी चार वाजता) होत होते. याखेरीज या तीन वेळांत येणे ज्या साधकांना शक्य नसेल त्यांना मार्गदर्शन होत असे.

३.  कार्य


जुन्या साधकांना बोध - प्रबोध -निजबोधाची उजळणी, एक अभ्यासू साधक बंधू या नात्याने गुरुमाऊली करुन देत होती. अशीच एका बोधाच्या उजळणीच्या वेळी नविन मुमुक्षुशरण येऊन व्यापकाच्या सत्तेत गुरुमाऊली ६ डिसेंबर १९९४ मार्गशीर्ष शुध्द चतुर्थी शके १९१५ रोजी सद्गुरूपदारुढ झाल्या.

गुरुमाऊलीचे मूळ प्राध्यापकी वळण, कुशाग्र बुद्धिमत्ता व कोणतीही गोष्ट ,व्यवहारतील किंवा जगातील घडामोडीचे उदाहरण घेऊन सेाप्यात सोपी करुन सांगण्याची हातवटी यामुळेच की काय विद्यार्थीतरुणवर्गाचे प्रमाण वाढले. इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या तिन्ही भाषामधून गुरुमाऊली समजावून देऊ शकत असल्याकारणाने आज गुरुमाऊलीचे हजारो सुशिक्षित व सुसंस्कृत शिष्य आढळून येतात. त्यामध्ये फक्त हिंदूच नव्हे तर मुसलमान आणि ख्रिष्चनही आहेत.

समाजातील अंधश्रध्दा, जातीभेद, वर्णभेद दुसऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेत आपल्या तुंबडया भरुन घेण्याची दांभिक प्रवृत्ती या सर्वांवर गुरुमाऊलीने सतत हल्ला केलेला आहे.

आपल्या शिष्यांच्या अंतर्गत सच्याप्रेमाची, उद्यमशिलतेची, साहसी प्रवृत्तीची धैर्योदात्ततेची, शौर्याची अशा अनेक गुणांची पेरणी आणि मशागत गुरुमाऊली करीत असते.

हे सर्व ती दैनंदिन आणि नैमित्तिक उपक्रमातून नियतकालिके आणि ग्रंथातून साधते. त्यातून ती सर्वसाधारण अभ्यासक्रममार्गाने जात जात साधक शिष्यांमध्ये परिपूर्णव्यक्तीमत्व घडवत असते. प्रत्येक उपक्रमहा जणू एंव व्यक्तीमत्व विकास शिबिरच असते.

अशाप्रकारे विकसित साधक, गुरुमाऊली च्या मार्गदर्शनाखाली कीर्तन प्रवचन करत करत आपल्या सहाध्यायींना शिकवत स्वतःही शिकत असतात.

संदेश