श्री सद्गुरू समर्थ दत्तात्रय गुरु ज्ञान मंदिर गोराई
English

विश्वस्त व्यवस्थेचा हेतू


अध्यात्मिक ज्ञानाअभावि आज समाजात नीतीमत्ता खालावलेली दिसते. समाजिक एकता व बंधुभाव नष्टप्रायझाला आहे.

•   अवघे विश्वचि माझे घर हे ज्ञानेश्वरांनी अलिकडल्या काळात मांडलेले विचार फक्त विचारवंताच्या चर्चेत न राहता सहज
   आचारात कसे आणावेत?
•   त्यासाठी आवश्यक अशी स्थितप्रज्ञता अंगी कशी आणावी?
•   भरतभूमिवर अगदी वेदकाळ पासून जोपासली गेलेली ‘वसुधैव कुटुंबकम’ ही वृत्ती वाढिस कशी लागेल?

या सर्व प्रश्नांची उत्तरे गुरुशास्त्र - श्री सद्गुरूसमर्थ दत्तात्रय महाराजांच्याशिकवणीनुसारदेणाऱ्या श्री सदगुरुसमर्थ माधुरीनाथांच्या शिकवणीत आढळतात.

खरा देव एकच आहे. खरा धर्मही एकच आहे या गोष्टीचे, अद्वैतमताचे, यथार्थज्ञान म्हणजे गुरुशास्त्राप्रमाणे दिले जाणारे अध्यात्मज्ञान सर्वसामान्य जीवांना नसल्यामुळे उपासनापध्दतीत स्थलकालमानाप्रमाणे पडलेल्या बदलामुळे भांबावून जाऊन त्यांसंबंधातच आपापसात भांडत बसतात. त्यात बदल होण्यासाठी सर्व विचारप्रणाली (हल्ली सरकार दरबारी ज्याला धर्म हे नांवआहे)वेगवेगळ्या नसून त्यातील समभाव समजणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे मनाने मानलेली विषमता दूर करुन श्री. सदगुरु समर्थ माधुरीनाथांच्या शिकवणीचा वाढावा जनसामन्यात व्हावा यासाठी ही संस्था कार्य करीत आहे.

हे कार्य करण्यासाठी संस्था प्रचलित भक्तीमार्ग म्हणजे कीर्तने,प्रवचने, नाटके,प्रार्थना,भजने, भारुडे, साहित्य प्रकाशन आदी मार्गांनी जनजागरण करते.अशाप्रकारची कीर्तने, प्रवचने, नाटके, सादर करण्यास किर्तनकार, प्रचवनकार, अगर अभिनेता / अभिनेत्री यांची गरज आहे. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्याचे कार्य श्री.स.स माधुरीनाथ करतात.त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले शिष्य त्यापुढे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कार्य करतील.

सध्या श्री.स.स माधुरीनाथांचे हजारोशिष्य असून त्यात सर्व धर्म, पंथ, जातीचा समावेश आहे. सद्यास्थितीत अनुग्रहीत शिष्यात ख्रिश्चन, मुस्लिम व बहुसंख्येने हिंदू समाजातील लेाक आहेत.

अशाप्रकारे अद्वैतमताचा प्रसार करण्यासाठी आवश्यक असा गुरुअनुग्रह व सतशिष्याचे प्रशिक्षण घेण्यासकोणताही मानवदेहधारी जीव पात्र आहे.फक्त तो मुका- बहिरा नसावा.

उपरोक्त संस्थेच्या स्थावर मालमत्तेचा वापर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी,कीर्तन -प्रवचनादी श्रवणासाठीच होतो. याचा लाभ अनुग्रहित गुरुभक्तच घेऊ शकतात.

संदेश