श्री सद्गुरू समर्थ दत्तात्रय गुरु ज्ञान मंदिर गोराई
English

परंपरा


हंस ब्रह्माअत्रिदत्त । निरंजन नारायण लक्ष्मणनाथ ।।
बलभीम भागिरथी दत्त । दत्तपदी माधुरी नमित ।।
माधुरीपदी ठेवु मस्तक नत । माधुरीपदी राहू दत्तचित।।

ही आपली गुरुपरंपरा आहे. अद्वैतज्ञानाचा श्रेष्ट सिध्दांत शिकविण्याऱ्या, मुक्तीचे ज्ञान देऊन मोक्षपदाला पेाहेाचविणाऱ्या अनेक गुरुपरंपरा या देशात आहेत. आपल्या परंपरेतील हंस व ब्रह्माहे दोन तत्व देह आहेत. महर्षि अत्रि हे आद्यगुरु.

श्रीगुरुदेवदत्त -
गुरुदेवदतांनी अत्रिगुरुकडून मिळालेल्या ज्ञानाचा मोठया प्रमाणात प्रचार व प्रसार केला. आजही महाराष्ट्रातील माहुर येथे दत्तशिखरावर श्री अत्रिऋषींचा आश्रम आणि अनसूया मंदिर पाहायला मिळते.
गुरुदेव दत्तात्रेयांपासून ते स.स. नारायण महाराज जालवणकरांपर्यंत अनेक सद्गुरू होऊन गेले.

श्री नारायण महाराज जालवणकर -
यांनी माळवा प्रांतात कार्य केले. त्यांचे सप्तसागर काही पदे, अनेक अष्टके प्रसिध्द आहेत.

स. स. लक्ष्मण महाराज
हे इंदोरचे राहणारे. त्यांनी ज्ञानप्रसार मुख्यत्वे उत्तर भारतात केला.

स. स. बलभीम महाराज साडेकर -
हे मूळ साडेगावला राहणारे इंजिनिअर होते. लहानपणापासून परमात्मप्राप्तीची ओढअसल्याने अनेक संताची भेट घेतली. परमात्म प्राप्तीची पक्की खात्री पटल्यावरचतेश्री लक्ष्मण महाराजांना शरण गेले. त्यांचे ज्ञानयज्ञाचे पदव पत्रांचा संग्रह विशेषप्रसिध्द आहे.

श्री. स.स भागिरथीनाथ वैद्य-
नरसिहंगड येथे श्री बलभीम महाराजांकडूनश्रीभागिरथी यांनी केवळ देव पाहण्यासाठी उपदेशघेतला व कृतार्थ झाल्या. मुख्यत्वे स्त्रीवर्गाला, बायाबापडयांना उध्दरण्याचे कार्य त्यांनी केले ब्रह्मात्मबोध सदगुरुनाटक, आनंदपदावर चौदा चौकडयांचे राज्य, अनेक पदे, आरत्या अष्टके वगैरे साहित्य प्रसिध्द आहे.

श्री. स.स दत्तात्रय चोळकर-
हे पुण्याचेच. ते लहानपणीच भागिरथीआईना शरण गेले.देवीरोगाच्या साथीत त्यांना चर्मचक्षू गमवावे लागले. पण त्याची बुध्दी अतिशय तीव्र होती. जवळ 30 वर्षे श्रीभागिरथीनाथांचे सान्निध्य, मार्गदर्शन, लाभश्री दत्तमहाराजांना झाला. विदर्भ पुणे मध्यप्रदेशातील काही भागात त्यांनी ज्ञान प्रसाराचे कार्य केले.

श्री. स.स माधुरीनाथ बल्लाळ-
ही भागिरथी ज्ञानगंगा दत्तशिखरावरुन वाहत गुरुमाऊलीच्या रुपाने आमच्या श्रवणात उतरली.

संदेश